शबनम न्युज | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते अजितपवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षाची सोलापूर शहर जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासंदर्भातील ध्येयधोरणांवर चर्चा करण्यात आली. शहरात भेडसावणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत पक्षश्रेष्ठींनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
या बैठकीला कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सोलापूर जिल्हा प्रभारी माजी मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष भारत जाधव, सोलापूर शहर निरीक्षक शेखर माने, संतोष पवार, महेश कोठे, महेश गादेकर, तौफिक शेख, दिलीप कोल्हे, शंकर पाटील, जुबेर बागवान, सुनिता रोटे, विद्या लोळगे, सुहास कदम उपस्थित होते.