माजी नगरसेविका प्रियांका बारसे आयोजित गौरी-गणपती सजावट सेल्फी स्पर्धा बक्षिस समारंभ उत्साहात पडला पार
भोसरी – गवळीनगर प्रभागातील महिलांसाठी मा.नगरसेविका प्रियांका बारसे यांनी गौरी व गणपती सेल्फी सजावट स्पर्धा आयोजित केली होती.
त्याचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आज ठेवण्यात आला होता.
त्याप्रसंगी नवरात्रोत्सवाचा काळ लक्षात घेऊन श्री दुर्गा मातेची पूजा व आरती करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
मा.नगरसेविका प्रियांका बारसे प्रभागअध्यक्ष अनुराधाताई दौंड ,डाॅ.सायली बारसे,आदर्श शाळेच्या उपमुख्याध्यापिका चित्र औटी,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.वंदना लढे,वैशाली पडवळ, प्रभागातील महिला प्रतिनिधी यांच्या हस्ते श्री तुळजाभवानीची व सरस्वती देवीची पूजा करण्यात आली .
दीप प्रज्वलन करून नगरसेविका बारसे यांनी महिलांशी संवाद साधला .
यावेळी बोलताना महिलांनी आत्मविश्वास वाढविणा-या उपक्रमात सहभागी होऊन प्रगतीचा मार्ग धरावा. छोट्या छोट्या उपक्रमांतुन अनुभव समृद्ध व्हावे. आपल्याला जे येत ते इतरांसमोर मांडता आल पाहीजे अस मा. नगरसेविका प्रियांका बारसे यांनी महिलांना सांगितले.
मार्गदर्शनपर संवादानंतर बक्षीस समारंभास सुरुवात केली.
सर्व सहभागी 374 महिलांना उत्तेजनार्थ पर्स वाटप करण्यात आले तर प्रथम पाच महिलांना पैठणी साडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रथम पाच क्रमांक
भारतीबाई खरात
हेमांगी बोऱ्हाडे
स्वाती कदम
संगीता कुलकर्णी
श्रध्दा तट
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ चित्रा औटी यांनी केले तर कार्यालय प्रतिनिधी कान्होपात्रा थोरात यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते