शबनम न्युज | पिंपरी
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर शेठ जगताप, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष श्री काळूराम शेठ बारणे,मा. नगरसेविका मनिषाताई प्रमोद पवार आणि मा. स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, संस्थापक प्रमोद पवार यांच्या उपस्थितीमध्ये श्री शिव छत्रपती शिवाजी मित्र मंडळ पडवळ नगर थेरगाव नारीशक्ती सन्मान देवीची महाआरती करण्यात आली.
यावेळी थेरगाव परिसरातील ३५१ महिला यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न झाली. त्यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सर्व नियोजन शिवछत्रपती शिवाजी मित्र मंडळ अध्यक्ष दिगंबर पवार व त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांनी केले.
Advertisement