शबनम न्युज | पुणे
मॉरिशस सरकारच्या शिक्षण मंत्रालय व इंटेलिजन्स माईंड ट्रस्ट, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘द ग्लोबल एज्युकेशनिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना जाहीर झाला आहे. ५ ते ८ ऑक्टोबर २०२२ या चार दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. येत्या गुरुवारी (६ ऑक्टोबर) मॉरिशस येथे होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपन यांच्या हस्ते प्रा. डॉ. चोरडिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी उप-पंतप्रधान लीला देवी दुकून, परराष्ट्र व्यवहार मंत्री अॅलन गानू उपस्थित राहणार आहेत. ‘सूर्यदत्त’ परिवाराने आपल्या कुटुंबप्रमुखाला मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.
प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, औद्योगिक व शिक्षण क्षेत्रातील अनुभवसंपन्न ग्लोबल कोच अशी जगभर ओळख असलेले प्रा. डॉ. संजय चोरडिया पुण्यातील सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आहेत. उद्योग व्यवस्थापनातील तज्ज्ञ, धोरणी, सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित आहेत. समाजातील सर्वच स्तरांतील विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे दर्जेदार शिक्षण माफक दरात उपलब्ध करण्यासाठी गेली २३ वर्षे ते कार्यरत आहेत. त्यांची दूरदृष्टी, समर्पित वृत्ती आणि अथक परिश्रम यामुळे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन यशस्वी रौप्यमहोत्सवी वाटचाल करत आहे.
शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय , केजी टू पीजी शिक्षण देणाऱ्या जवळपास २३ पेक्षा अधिक इन्स्टिट्यूट्स सूर्यदत्त संकुलात आहेत. त्यासह संशोधन केंद्र, सेंटर ऑफ एक्सलन्स, प्रशिक्षण केंद्र, संशोधन व मार्गदर्शन, इनोव्हेशन व इन्क्युबेशन सेंटर अशा विविध स्वरूपात दर्जेदार शिक्षणाचे दालन सूर्यदत्तच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. बिझनेस मॅनेजमेंट, माहिती तंत्रज्ञान, हॉस्पिटॅलिटी ऍन्ड ट्रॅव्हल टुरिझम, इंटेरियर अँड फॅशन डिझाईन, अनिमेशन, हेल्थ अँड फिटनेस, थिएटर अँड परफॉर्मिंग आर्टस्ब, सायबर सिक्युरिटी, फिजिओथेरपी, कायदा, फार्मसी, नर्सिंग, होम सायन्स, टीचर एज्युकेशन, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यासह इतर अनेक प्रकारच्या शाखांचे शिक्षण दिले जाते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा उद्योग क्षेत्रातील २० वर्षांहून अधिक आणि शिक्षण क्षेत्रातील २५ वर्षांहून अधिक कार्याचा सन्मान म्हणून या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. शिक्षण आणि शैक्षणिक-सामाजिक उपक्रमातून त्यांनी दिलेले उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन मॉरिशसच्या शिक्षण मंत्रालय व इंटेलिजन्ट माइंड्स ट्रस्ट यांनी त्यांचा गौरव केला आहे. भारतभरातून या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या २० प्रख्यात व्यक्तींमध्ये प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा समावेश आहे. डून इंटरनॅशनल स्कुल, एसएनबीपी ग्रुप, डीपीएस स्कुल, रियान इंटरनॅशनल स्कूल, रेनबो स्कूल, सेंट पॉल्स इंटरनॅशनल स्कुल यासह इतर नामवंत शिक्षण संस्थांचे पुरस्कारार्थी आहेत. या मॉरिशस भेटीवेळी विद्यार्थी व फॅकल्टी एक्स्चेंज प्रोग्रॅम, संयुक्त संशोधन प्रकल्प, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया मॉरिशस सरकारमधील अधिकारी, प्रतिनिधींना भेटणार आहेत.