पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ यांची कारवाई
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
हॉटेलचे नूतनीकरण करण्यासाठी ५ कोटी रुपयांचे कर्ज काढून देतो, असे सांगत एकास लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. अमोल माणिकराव पाचपुते (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे फिर्यादीचे नाव असून बालाजी उर्फ एकनाथ बळीराम घोडके (वय ३२, रा. दौंड), संग्राम सिंह अरुणराव यादव (वय ४६, रा. कोल्हापूर), राजवीर उर्फ हसन अकबर मुजावर (वय ३०, रा. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल पाचपुते यांना हॉटेलचे नूतनीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यावेळी त्यांची ओळख बालाजी घोडके यांच्या बरोबर झाली. बालाजीने त्यांना ५ कोटींचे कर्ज काढून देतो म्हणून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली व ॲडव्हान्स हप्ता म्हणून असे मिळून २ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली. सदर आरोपींकडे एकूण १८५ विविध बँकांचे कोरे तसेच रक्कम असलेले चेक तसेच कर्ज काढण्यासंबंधित कागदपत्रे, मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. तसेच सदर तिन्ही आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून गुन्हा यांचा अधिक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मुख्यालय /गुन्हे डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतसर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, पो.ह.वा. प्रवीण दळे, आदिनाथ मिसाळ, रोहिदास आडे, पो.ना./ वासुदेव मुंडे, सुनील गोटे, सुरेश जायभाय, पो.शी. तुषार काळे, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, स.पो.नि. सागर पाणमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.