शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
महिलेला मारहाण तसेच शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पती,सासू,सासरे यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे ०८/०२/२०२० ते १२/०१/२०२३ या कालावधीत घडली. या प्रकरणी पती यासिन फारुख शेख (वय ३१), फियादीची सासू आणि सासरे फारुख अहमद शेख या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी मिळून फिर्यादी यांना नेहमी शिवीगाळ तसेच मारहाण व शारीरिक व मानसिक त्रास दिला, तसेच यासिन याने फिर्यादी सोबत संमतीशिवाय जबरदस्तीने अत्याचार केले. व त्यांनतर फिर्यादी यांना जाचक त्रास देऊन तलाक दिला, तसेच फिर्यादी यांच्या आई वडिलांनाही शिवीगाळ केली. या घटनेचा अधिक तपास पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहे.