शबनम न्युज | मुंबई
खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली. आताच्या घडीला संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात असून, हा मुक्काम वाढला आहे.संजय राऊत यांना दसराही तुरुंगातच घालवावा लागणार आहे.
गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजाणी संचालनालयाने ( ईडी) ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर २७ सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, कोर्टाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलली होती.
Advertisement