शबनम न्युज | पिंपरी
महिलेच्या घरात विनापरवानगी येऊन तिला चप्पलने मारहाण करून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून विनयभंग करण्यात आला. ही घटना ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी २३ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा मित्र आहे, तो विनापरवानगी फिर्यादीच्या घरी आला. फिर्यादी आणि आरोपीत झालेल्या वादातून आरोपीने चपलेने फिर्यादीला मारहाण केली.
Advertisement