शबनम न्युज | पिंपरी
फ्लॅट विक्री करायची आहे, असे सांगून खरेदी दाराकडून १९ लाख १५ हजार घेऊन फ्लॅटची विक्री दुसऱ्याच व्यक्तीला करून फसवणूक केली. हा प्रकार गणेश नगर कॉलनी, बोपखेल येथे २०१२ ते ३ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत घडला.
याप्रकरणी महेश शामराव कोळगे (वय ४१, रा. बोपखेल) यांनी दिघे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी परिमल घुले, राजेश तुळशीदास चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी राजेश चौधरी याला अटक केली आहे.
Advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांचा परिमल हाइट्स, गणेश नगर येथील फ्लॅट देणार आहे असे सांगून फिर्यादी यांच्याकडून ५ लाख १० हजार तसेच महिला साक्षीदार यांच्याकडून ५ लाख तसेच दिलीप दशरथ लिंगवत त्यांच्याकडून ९ लाख असे एकूण १९ लाख १५ हजार रुपये घेतले.