शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
नवरात्र उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या उत्साहात दसरा सण नागरिकांनी, साजरा केला तसेच या नवरात्र उत्सवानिमित्त विविध ठिकाणी दांडिया, नृत्य तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असताना, पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या करिश्मा सनी बारणे यांच्या वतीने ‘सन्मान नारी शक्तीचा’ हा भव्य दिव्य महिलांचा सत्कार सन्मान करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमांच्या निमित्ताने थेरगाव परिसरातील ३० महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. नारीशक्ती तसेच नारी म्हणजे दुर्गा देवीचे नऊ रूपे आपण या देवींची या नवरात्र उत्सवात पूजा करत असतो. आजच्या नारी याही दुर्गा देवीप्रमाणेच सक्षम आहेत व यानिमित्ताने या सक्षम स्त्रियांचा सन्मान, सत्कार होणे आवश्यक आहे. या भावनेतून या नवरात्र उत्सवानिमित्त हा नारीशक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला, असल्याचे आयोजिका करिश्मा सनी बारणे यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक अभिषेक बारणे, सिद्धेश्वर बारणे , कैलास बारणे, काळुराम बारणे, संदिप गाडे, तानाजी बारणे, जयदिप माने, प्रमोद पवार, नरेंद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते.