मॅनेजमेंट सेल कार्यकारणी नियुक्ती जाहीर
पिंपरी चिंचवड | शबनम न्यूज
पिंपरी चिंचवड शहरात ईद मिलादुन्नबी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रवादीच्या मॅनेजमेंट सेलवतीने गरजू कुटुंबांना, तसेच सफाई कामगारांच्या कुटुंबांना अन्नधान्य रेशन किट वाटप करण्यात आले. हे रेशन किट 200 कुटुंबांना वाटण्यात आले. तसेच यावेळी पिंपरी चिंचवड शहर मॅनेजमेंट सेल कार्यकारणी ची नियुक्ती करण्यात आली या कार्यकारणीच्या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माझी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, प्रसाद शेट्टी, आयुब भाई शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरक्ष लोखंडे ईक्लास सय्यद, सिकंदर शेख मंजूर शेख कुरेशी नसीर शेख तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादीच्या मॅनेजमेंट सेलचे शहराध्यक्ष अकबर भाई मुल्ला यांनी केले तसेच त्यांनी सर्व उपस्थित यांचे आभार व्यक्त केले