शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन आयोजित गौरी सजावट स्पर्धा २०२२ चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात साजरा
शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी जगताप व कन्या ऐश्वर्या जगताप-रेणुसे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक १७ मधील महिला भगिनींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने गेली १० वर्ष शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करत असते.याही वर्षी महिला भगिनींसाठी गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार दि. ०८ रोजी या सजावट स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. यावेळी अश्विनीताई जगताप व ऐश्वर्या जगताप रेणुसे, नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे, नगरसेविका आरती चोंधे , संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका चंद्रकला शेडगे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकारी रंजना चिंचवडे , सामाजिक कार्यकर्त्या कविता दळवी ,ज्योती ढाके ,माधुरी आव्हाळे, कुमारी निशिगंधा वाल्हेकर , देवयानी पाटील या मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या महिला भगिनींना बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस :- (सोन्याचे पेंडंट व पैठणी) चे विजेते सौ .इंदू सोमनाथ झोळ, द्वितीय क्रमांक :- (चांदीचा मेखला व पैठणी ) संगीता सर्जेराव दराडे, तृतीय क्रमांक:- (पूजेचे साहित्य व पैठणी) सौ .सिंधू संभाजी मरळ, चतुर्थ क्रमांक:- (पैठणी व समई ) सौ. गीता आनंदराव शिंदे , पंचम क्रमांक:- (डिझायनर साडी व समई) सौ .उज्वला संजय लांडगे याव्यतिरिक्त सहभागी प्रत्येक महिलेला शेखर आण्णा चिंचवडे यांच्या वतीने यावेळी प्लास्टिक टाळा कापडी पिशवी वापरा या संदेशा बरोबरच प्रत्येक सहभागी स्पर्धक महिलेला डिझायनर साडी गिफ्ट देण्यात आली. यावेळी शेखर चिंचवडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर महिला भगिनींचे आभार मानले.