शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय डुडूळगाव या ठिकाणी भारतरत्न डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून इंग्रजी विभागाच्यावतीने स्पोकन इंग्लिश व कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमा अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व कल्पना राठोड, वैष्णवी इप्पर, मनीषा टाकडा व काजल फुंदसे यांच्या स्वागत गीताने झाली.प्रास्ताविक करतांना इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. छाया जोशी यांनी कार्यक्रमाचा उद्देश व ध्येय सविस्तर स्पष्ट करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व ऍड ऑन कोर्सची माहिती प्रा. विश्वनाथ व्यवहारे यांनी सविस्तर करून दिली.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना प्रमुख पाहुणे डॉ. अर्जुन जाधव – माजी इंग्रजी विभागप्रमुख, फर्ग्युसन कॉलेज, पुणे यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनातील आठवणी व प्रसंग व्यक्त करीत आत्मविश्वास हा कशा प्रकारे जीवन घडवितो हे विविध उदाहरणांचे दाखले देत मार्गदर्शन केले. इंग्रजी भाषा शिकतांना कोणत्या महत्वपूर्ण बाबी आत्मसात केल्या पाहिजेत हे सांगून घर बांधण्यासाठी जसे विविध साहित्य लागते त्याच पद्धतीने इंग्रजी भाषा शिकण्यासाठी शब्दा सह कशी विविध घटकांची आवश्यकता असते याबाबत सविस्तर मत मांडले. आधुनिक काळात स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर इंग्रजी या भाषेला अवगत करण्याची आवश्यकता व्यक्त करून कोणतेही कार्य मनापासून केले तर ते निश्चितच पूर्ण होते त्यासाठी जिद्द, प्रयत्न व चिकाटीची कशी आवश्यकता आहे यासंदर्भात सविस्तर विवेचन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी सद्यस्थित हजारो विद्यार्थी भाषेवरील प्रभुत्वामुळे स्वीकृतीमुळे कसे विविध क्षेत्रात यश मिळवित आहेत. यावर भाष्य करीत मातृभाषा, राष्ट्रभाषा व आंतरराष्ट्रीय भाषा जीवन बदलविण्यासाठी कशा कारणीभूत ठरतात हे विविध उदाहरणासह व्यक्त केले. वाचन प्रेरणा दिनावर मत व्यक्त करतांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कथा,कविता,कादंबरी, नाटके, प्रवासवर्णने, आत्मचरित्र वाचल्याने जीवनात कसा बदल होतो याबाबत मत व्यक्त करून स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कशी महत्त्वाची आहे याबाबत मत मांडले. यावेळी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्यांकडून महत्वपूर्ण मूल्यांची प्रतिज्ञा वदवून घेतली.
या कार्यक्रमासाठी मा.श्री. मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाला प्रा. डॉ. पांडुरंग मिसाळ, प्रा. संजीव कांबळे, प्रा. माणिक कसाब, प्रा. शैला वाळुंज, प्रा, शाहूराज येवते,प्रा. कैलास अस्तरकर, प्रा. परमेश्वर भताशे,प्रा. दिलीप बारी, डॉ.रणजित कदम,प्रा.विकास दिघे,प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा. सविता मानके, प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. दिपाली ताम्हाणे, प्रा. सोनाली अभंग, प्रा. सोनाली तापकीर, प्रा. डॉ. राजू शिरसकर, मा.श्री.प्रवीण भावे,श्री. वैभव बडवे,श्री.श्रीकांत कांबळे व कला,वाणिज्य, व बी.बीए(सी.ए.) शाखेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार प्रा. प्रविण डोळस यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. माणिक कसाब यांनी दिली.