शबनम न्युज | पुणे
‘डिफरंट स्ट्रोक्स ‘ प्रस्तुत’ कलरलेस ‘ या भरतनाट्यम,अभिनय आणि चित्रकलेचा एकत्रित अविष्कार असलेल्या प्रायोगिक सादरीकरणाला मंगळवारी रात्री चांगला प्रतिसाद मिळाला.
१८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ७:३० वाजता ,द बेस , एरंडवणे येथे हा प्रयोग झाला. संकल्पना सुचेता जोशी यांची होती. प्रकाश योजना सचिन लेले यांची होती. या सादरीकरणाला आनंद चाबुकस्वार यांनी आवाज ( व्हॉईस ओव्हर ) दिला. १२ युवती यात सहभागी झाल्या.
कलरलेस हा या पूर्वग्रहांनी त्रासलेल्या मनाचा व मनातील चेतना, जाणीवा यांचा संवाद होता. मन ज्यावेळा तटस्थपणे आपल्या चुकांकडे बघते, आपण असं का वागतो याचा मागोवा घेते, तेव्हा त्याला काय दिसते त्याचे प्रतिबिंब कलरलेस मध्ये रसिक प्रेक्षकांना दिसले.