शबनम न्युज | नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
आज काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी विजय मिळविला आहे. ते आता पक्षाचे नवे अध्यक्ष होणार आहेत.या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे ७८९७ मतांनी विजयी झाले तर त्यांच्या विरोधातील उमेदवार शशी थरूर यांना सुमारे १००० मते मिळाली त्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तसेच खरगे ८ पट अधिक मतांनी विजयी झाले आहेत. अशी माहिती काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी दिली.
पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीच्या शेवटी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ९ ,५०० हून अधिक प्रतिनिधींनी मतदान केले. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस मुख्यालयातील कार्यक्रमात निवडून आलेले अध्यक्ष दिवाळीनंतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारतील.
Advertisement