शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना दिवाळीपुर्वी बोनसची रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी हनुमंत लांडगे (प्रदेश सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, कामगार आघाडी ) यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विविध विभागात ठेकेदारी करार पद्धतीने जवळपास १० हजार पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांची नेमणुक केलेली आहे. या कामगारांना महानगरपालिकेने करारानुसार दरमहाच्या पगारातुन किमान वेतन कायद्यानुसार दरमहा ८.३३ टक्के बोनसची रक्कम अदा केला जातो. परंतु प्रत्येक ठेकेदार त्या कर्मचा-यांना दरमहा तो मिळणारा बोनस दरमहा देत नाही. सदरचा बोनस रक्कम ही दिवाळीसाठी राखुन ठेवला जातो. परंतु प्रत्येक ठेकेदार तो बोनस कामगारांना देईलच असे होत नाही. आपण प्रत्येक विभागाला कळवुन कंत्राटदारांना त्यांच्या कर्मचा-यांना दिवाळीपुर्वी बोनसची रक्कम अदा करण्याचे आदेश द्यावे. तसेच कंत्राटी कामगारांच्या सेवाशर्तींबाबत झालेल्या कराराचे पालन व्हावे आणि कंत्राटी कामगारांना बोनस अदा केलेबाबतचा सविस्तर पुर्तता अहवाल उलट टपाली मिळावा, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना त्यांच्या समवेत दिपक वसंत गळितकर (सदस्य, भारतीय जनता पार्टी, कामगार आघाडी) उपस्थित होते.