शबनम न्युज | पुणे
मॉडर्न एज्यकुेशन सोसायटीच्या कुसरो वाडिया पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये या शक्षैणिक वर्षापासून (२०२२-२३) सुरु झालेल्या कम्प्युटर अँड इंटरनेट ऑफ थिंग्स इंजिनिअरिंग (सगंणक आणि इंटरनेट ऑफ थिंग्स अभियांत्रिकी) या तीन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात केवळ ‘कुसरो’मध्येच हा नाविन्यपर्णू अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तंत्रशिक्षण क्षेत्रामध्ये आठ दशकांपेक्षा अधिक काळ रोजगाराभिमुख आणि दर्जेदार शिक्षणाची परंपरा जोपासणाऱ्या कुसरो वाडिया इन्स्टिटयटू ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित तंत्रनिकेतनामध्ये यावर्षीही १०० टक्के प्रवेश झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ए. एस. चांडक यांनी दिली.
डॉ. ए. एस. चांडक म्हणाले, “कम्प्युटर अँड इंटरनेट ऑफ थिंग्स इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) नवी दिल्ली, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्याकडून मान्यता प्राप्त झालेली आहे. संगणक युगातील आवश्यक त्या सर्व गरजांचा विचार करून विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या अधिकाधिक संधी मिळण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.”
नुकतेच महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मान्यता मडंळाकडून (एनबीए) २०२५ पर्यंत मान्यता प्राप्त झाली आहे. संस्थेने स्थापनेपासून जपलेली शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि सर्व विभागप्रमुख, अनभुवी प्राध्यापक व कर्मचारी यांचे प्रामाणिक प्रयत्न याचे हे यश असल्याचे डॉ. ए. एस. चांडक यांनी नमदू केले.