शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क तर्फे विद्यार्थ्यांसाठी येत्या मंगळवारी (दि. २५) रोजी दुर्बिणीतून खंडग्रास ग्रहण पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सायन्स पार्कतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. त्या अंतर्गत हा उपक्रम होणार आहे. मंगळवारी (दि. २५) रोजी दिसणारे खंडाग्रास ग्रहण दुर्बिणीला विशेष सोलर फिल्टर लावून पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सायंकाळी ४ ते ५:३० या वेळेत हे ग्रहण पाहता येणार आहे. तर १ व २ नोव्हेंबर आणि ४ व ५ नोव्हेंबर रोजी रोबोट विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच ८ नोव्हेंबर रोजी खंडग्रास ग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे . तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन ही सायन्स पार्कच्या वतीने करण्यात आले आहे.
Advertisement