शबनम न्यूज | न्यूज
पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव रुग्णालयात होणाऱ्या गैरसोयी दूर करण्याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते रवी भिलारे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग प्रभाग कार्यालयात आयुक्त उपायुक्त तसेच प्रभाग अध्यक्ष यांना दिले आहे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे कि
थेेरगाव रुग्णालयात नविन केस पेपरसाठी महिला व पुरुष एकाच लाईनीमध्ये असतात. त्या गर्दीमुळे त्याचापासुन रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.आरोग्याच्या समस्या निर्माण होतील.महिला वर्ग, लहान बालके यांना तासनतास लाईन मध्ये उभे रहावे लागते पुरुष, महिला,लहान बालकांना घेऊन येणाऱ्यांची परिणामी गैरसोय होते.पुरुष व महिलांच्या लाईन वेगवेगळ्या केल्यास परिणामी लहान बालके व महिला वर्गाची गैरसोय होणार नाही.प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी होईल.
यात दुमत नाही.
सदर परिस्थितीस पालिका प्रशासन व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून योग्य तो निर्णय घेत अंमलबजावणी करावी हि विनंती. निवेदनातील प्रमुख मागण्या
१} महिला रुग्णांसाठी वेगळी लाईन करावी.
२} लहान बालकांसाठी प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
३} फोन-पे,गुगल पे ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याची सोय करण्यात यावी.
४} जन्मजात, लहान बालकांना भुक लागल्यास आईचे दुध पाजण्यासाठी स्वतंत्र कक्ष अथवा स्वतंत्र काँबिन व्यवस्था करावी.
५} गरोदर स्ञीयांना औषधे घेण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे
६} केस पेपर जमा न करता रुग्णांना देण्यात यावा.बाहेरील रुग्णालयात ट्रिटमेंट घेण्यासाठी.
आम्ही आपणापर्यंत भविष्यातील उपाययोजनांबाबत लक्षात पर्याय सुचविलेले आहेत.तरी आपण सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून नियोजन राबवित होणार्या गैरसोयी संदर्भात योग्य निर्णय घेत मागण्या मान्य कराल.
अशी आशा बाळगतो.सदर बाबीसाठी आम्हाला सहकार्य होईल असे निवेदनात सामाजिक कार्यकर्ते रवी भिलारे यांनी नमूद केले आहे.