शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात नोकरी निमित्त आलेल्या युवकांनी एकत्र यावे, यासाठी कोंकण प्रिमियर लीगचे आयोजन गेली दोन वर्षे पासून होत आहे. याच कोंकण प्रिमियर लीगचे दुसरे पर्व मा. महापौर हनुमंतराव भोसले स्पोर्ट्स क्लब नेहरुनगर येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. या स्पर्धेत एकुण ७ संघांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यामधुन ऋषी साळवी विघ्नहर्ता संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर अविनाश बागावडे यांच्या धडाकेबाज संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आणि तृतीय क्रमांक विजय निवळकर यांच्या श्री स्वामी समर्थ इलेव्हन या संघाने पटकावला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून सौरभ म्हापदी याला तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अविनाश बागावडे याला गौरविण्यात आले.
दरम्यान या स्पर्धेचं उद्घाटन सत्यवान साळवी(अध्यक्ष-कोकणस्थ कुंभार समाज पिं.चिं) व श्री प्रकाश शिवणकर(सहसचिव-कोकणस्थ कुंभार समाज पिं.चिं),श्री प्रकाशजी साळवी (तहसिलदार-मंडणगड) राजेंद्र साळवी(कोंकण प्रिमियर लीगचे आधारस्तंभ) श्रीरामचंद्र शिरकर (टेरव) गजानन बागावडे (उपाध्यक्ष-कुंभार समाज विकास संस्था पुणे) आनंद साळवी (उपाध्यक्ष-कोकणस्थ कुंभार समाज पिं चिं) यांच्या हस्ते झाले,त्यानंतर सत्यवान साळवी यांनी सर्व खेळाडूंना प्रतिज्ञा दिली व पुढील सामन्याला सुरुवात झाली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक राहुल भाऊ भोसले यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली व मुलांचं या कौतुक केलं कोकणातून येऊन नोकरी व्यवसाय करून आपण सर्व युवक कोंकण प्रिमियर लीग करता हे खरंच कौतुकास्पद आहे.
या स्पर्धेसाठी साऊंड सिस्टीम,पिण्याचे पाणी,मैदान विनामूल्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल सन्मानीय श्री राहुलजी भोसले यांच्या सन्मान करण्यात आला हे सर्व मिळवून देण्यासाठी श्री प्रकाशजी शिवनकर यांनी मदत केली त्याबद्दल त्यांच्या देखील सन्मान करण्यात आला.या स्पर्धे करिता आसन व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर नेहरूनगर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.या स्पर्धेला महिंद्रा कामगार संघटनेचे युनियन लीडर श्री नितेशजी शिर्के यांनी भेट देऊन सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
हि स्पर्धा आयोजित करून कोकणातून आलेल्या बहुसंख्य मुलांना एकत्रित करण्याचे काम केल्याबद्दल अनेकांनी ज्ञानेश निवळकर, राकेश साळवी, संजय निवळकर, अविनाश बागावडे यांचे कौतुक केले.