शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
काळा जादू केल्याचा संशय घेत एकाने आपल्या मेहुणीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मीबाई श्रीराम (वय ५४) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून श्रीनिवास श्रीराम (वय ५९) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सागर दासा (वय ३९, रा. वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई या शुक्रवारी एका धार्मिक कार्यक्रमासाठी सागरच्या घरी आल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास श्रीनिवास घटनास्थळी आला, त्याने लक्ष्मीबाई वर त्यांच्या कुटुंबावर काळा जादू केल्याचा संशय घेत ती त्याला त्याच्या आईला भेटू देत नसल्याचा दावाही केला तसेच लक्ष्मीबाई यांच्यावर धारदार चाकूने वार करून हत्या केली.
Advertisement