शबनम न्युज | पुणे
श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाचा गुन्हा हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. महाराष्ट्र पोलिस या प्रकरणात योग्य तपास करून गुन्हेगाराला मोठी शिक्षा निश्चित देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याशिवाय देशात कुठेही महिला अथवा नागरिकांविरोधात काही चुकीच्या घटना घडत असतील तर पोलिस यंत्रणेने कोर्टाची मदत घेऊन फास्ट ट्रॅक कोर्टात हे गुन्हे चालवले पाहिजे, असे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी माध्यमांपुढे व्यक्त केले.
Advertisement