शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहराला रोज पाणी पुरवठा करा, अशी मागणी करत शहर मनसे पाणी प्रश्नावर आक्रमक झाली असून, मनपाच्या पाणीपुरवठा व जलनि:सारण विभाग बाहेर मनसे वतीने आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, बाळा दानवले, रुपेश पटेकर, सचिन शिंगाडे, विनोद भंडारी, अंकुश तापकीर, विशाल मानकरी, राजू साळवे, सुशांत साळवी, सुरेश सकट, नितीन चव्हाण, शिवकुमार लोखंडे, जितेंद्र वाल्हेकर, आकाश पांचाळ, महिला शहरअध्यक्ष अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख, श्रद्धा देशमुख, अनिता पाटील उपस्थित होते.
मागील ३ वर्षा पासुन पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे शहरातील सर्व नागरीक त्यांच्या मध्ये मोठे नैराश्य आहे. गेल्या सलग ३ वर्ष मनसे शहरातील पाणी पुरवठा विषयी मागणी करत आहे. असे यावेळी सचिन चिखले यांनी सांगतले.