शबनम न्युज | मुंबई
आज पतंजलीचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ‘महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही(पंबाजी ड्रेस) छान दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही घातले नाही तरी छान दिसतात.’ असे महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य रामदेव बाबानी पतंजलीच्या मोफत योग शिबिरात बोलताना केले.
यावेळी त्यांच्या सोबत मंचावर त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदें उपस्थित होते. यांनतर रामदेव बाबानी अमृता फडणवीस यांचे कौतुक देखील केले. ते म्हणाले, अमृता फडणवीस हिशोबात अन्न ग्रहण करतात. पुढील शंभर वर्षे त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. याचे कारण म्हणजे त्या नेहमी आनंदी राहतात, असे बाबा रामदेव म्हणाले. तसेच जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर असतो, तसाच आनंद मला तुमच्या (उपस्थित महिला) चेहऱ्यावर पाहायचा आहे, असेही त्यांनी म्हटले.