सोनारी फाटा ते जवळगाव रस्त्यावरील कामे निकृष्ट दर्जाचे ; चौकशीची मागणी
– विजय वाठोरे
शबनम न्युज | हिमायतनगर
सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर अंतर्गत उपविभागीय कार्यालय हिमायतनगर मार्फत मौजे सोनारी फाटा ते मौजे जवळगाव गावांपर्यंत राज्यसीमा रस्ता क्रमांक २६३ वरील रस्त्याचे रुंदीकरण,मजबुतीकरण,पुलं मोरयासह डांबरीकरण करण्यासाठी केंद्रातील सीआर आयएफ निधी मार्फत अडीच ते तीन किलोमीटर कामासाठी एकूण तीन कोटी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.आणि हे काम नांदेड येथील राजकीय वलयप्राप्त गुत्तेदारास मंजूर झाले आहे.परंतु संबंधित गुत्तेदारांनी अंदाजपत्रकातील एकूण मानकाप्रमाणे काम न करता आपल्याच मर्जीप्रमाणे काम करीत असल्याचा आरोप या गावातील नागरिक वारंवार करीत आहेत.तर पूल बांधकामाविषयी बाजूच्यां शेतकऱ्यांचा आक्षेपअसतानाही पुलाचे काम गुत्तेदारांनी सुरूचं ठेवले आहे.
याविषयी उपाभियंता व शाखा अभियंता कामावर प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी व शेतकऱ्यांच्यां आक्षेपा विषयी सुक्ष्म निरीक्षण करणे गरजेचे होते.तर अंदाजपत्रका प्रमाणेच काम करून घेणे या संबंधित अभियंत्यांची जबाबदारी असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुद्धा या ठिकाणी होत आहे.सिमेंटच्या कामात वाळू ऐवजी डस्टचा वापर केला जात असूनही माती मिश्रित डस्त कामात वापर होत असल्याने काम किती दिवस टिकेल ? याची शाश्वती दिसत नाही. यामुळे काही दिवसातच या कामाची गुणवत्ता या कामावरील कोटी रुपयांचा निधी वाया जाणार असल्याचे या कामावरून दिसून येते आहे.याकडे सा.बा.उपविभागांनी लक्ष देणे अतिशय गरजेचे बनले आहे.भविष्यात या रस्त्यावर निकृष्ट कामामुळे पुन्हा खड्डे पडून सर्व निधी गुतेदारांच्या घशात जाऊन या रस्त्याचे पुन्हा मागील हाल होणार आहे.
सध्या या रस्त्याचे काम चालू असून ते काम अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्वक होण्यासाठी याच रस्त्यावर गावं असलेले स्थानिक आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी वरिष्ठांना सूचना देऊन काम अतिशय सुमार व दर्जेदार करणे तर दोषी गुत्तेदारांवर कारवाई होणे गरजेचे बनले आहे.