मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली
शबनम न्युज | पुणे
ज्येष्ठ नागरिक संघ, गोकुळनगर(कात्रज – कोंढवा रस्ता) आणि लोकजनशक्ती पार्टी कडून संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. मुंबई दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या सर्वांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर- जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट, गोकुळनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधूसुदन कोरेकर, उपाध्यक्ष मधुकर खांगटे, बाळाभाऊ कवडे,रोहित साळवे, नागेश भोसले, दिलीप गिते, केशव शितोळे, शांताराम दारवटकर , चंद्रकांत खरात, संजय पारेख आदी उपस्थित होते.