शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रा.शाहूराज येवते, बी.बी.ए.(सी.ए.) शाखेचे विभाग प्रमुख यांच्या वतीने पी.पी.टी. च्या साहाय्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा अर्ज तसेच अकॅडमीक बँक ऑफ क्रेडिट ची ऑनलाईन प्रक्रिया कशी पूर्ण करावी या संदर्भात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन व कार्य त्यांचे आचार विचार व्यक्तीच्या जीवनात कसे प्रेरणादायी आहेत या संदर्भात सविस्तर विवेचन केले . महात्मा फुले यांनी १८४८ मध्ये सर्वसामान्य वर्गांच्या शैक्षणिक विकासासाठी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढण्याचा उद्देश आणि ध्येय स्पष्ट केले.
महात्मा फुले यांनी महिलांना शिक्षण देण्यामागची भूमिका काय होती यासंदर्भात मत मांडताना व्यक्ती जीवनात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांची कशी आवश्यकता आहे या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. तसेच ऑनलाइन प्रक्रियेच्या बाबतीत महाविद्यालयातील कोणताही विद्यार्थी कमकुवत ठरू नये अशी इच्छा व्यक्त करीत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी, मा. मयुर ढमाले, खजिनदार, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाला प्रा.प्रेरणा पाटील,प्रा.सोनाली अभंग,प्रा.सोनाली तापकीर, प्रा.राजेश्री खडके यांनी कार्यशाळे मध्ये विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.