शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली ते रहाटणी व चऱ्होली ते कार्पोरेशन ही बस नियमितपणे चालू करा, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका विनया तापकीर यांनी ट्रान्सपोर्ट मॅनेजर, पीएमपीएमएल स्वारगेट, पुणे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, बरेचशे कामगार तसेच महिला वर्ग ज्यांना कामानिमित्त पुणे रहाटणी अशा ठिकाणी रोज चे येणे जाणे करावे लागते, त्याच बरोबर जेष्ठ नागरिकांना हि ये जा करावी लागते, अशाच बरोबर मुला-मुलींना शाळा, कॉलेज साठी पुणे, रहाटणी, पिंपरी चिंचवड या ठिकाणी रोज जाणे येणे करावे लागते, परंतु आमच्या प्रभागतून एक ही कापरिशन बस पुणे तसेच रहाटणी या ठिकाणी जात नसल्याने या प्रभागतील नागरिकांची, महिलांची, जेष्ठ नागरिकांची व तसेच विदयार्थी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी त्यांची गैरसोय व अडचण लक्षात घेता चऱ्होली ते रहाटणी व चऱ्होली ते कार्पोरेशन हि ६ वा. चि बस चन्होली आझाद नगर ( मार्गी) नियमित पणे चालू करून द्यावी, असेही सदर निवेदनात विनया तापकीर यांनी नमूद केले आहे.