शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचा-यांचे पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीत मोठे योगदान असून त्यांनी केलेल्या उत्तम कामामुळे शहराचा नावलौकिक वाढला आहे. या योगदानाबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी सेवानिवृत्त कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे नोव्हेंबर २०२२ अखेर सेवानिवृत्त होणा-या २२ कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे नंदकुमार इंदलकर, माया वाकडे तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम, मुख्याध्यापिका रजिया तांबोळी, कार्यालय अधिक्षक राजेंद्र देशपांडे, प्रतिभा क्षीरसागर, उल्हास देवचक्के, मुख्य आरोग्य निरीक्षक राजू बेद, मुख्य लिपिक काळुराम भालेकर, अंजली टिंगरे, स्टाफ नर्स मनिषा जावळे, सहाय्यक शिक्षिका अंजली कदम, उपशिक्षिका वंदना पाटील, मुकादम राजेंद्र सुमंत, रखवालदार विद्याधर धिवार, सफाई कामगार विद्या कोतवाल, विद्याबाई रोकडे यांचा समावेश आहे.
तसेच नोव्हेंबर २०२२ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये मुख्य लिपिक नाजीम आतार, सफाई कामगार नागनाथ वाघमारे, गोजाबाई गावडे, कल्पना आगळे, सफाई सेवक गीता उजिनवाल, कचराकुली राजू तुळवे, नरेश कदम यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी मानले.