पंढरीच्या विठुरायाच्या व अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाने भाविक भारावले
शबनम न्युज | पिंपरी
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आतिष बारणे यांच्या वतीने त्यांच्या मोशी येथील प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांना पंढरपूर व अक्कलकोट या तीर्थक्षेत्राची यात्रा घडविण्यात आली. यामध्ये विठुरायाच्या व स्वामी समर्थांची दर्शन भाविकांनी घेतले. या यात्रेमध्ये आबाल वृद्धांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. तसेच ते सहभागी सर्व उत्साहित दिसून येत होते. सर्व नागरिक भक्ती रसात तल्लीन झालेले पाहावयास मिळाले. सर्व भाविक भजनामध्ये रंगून गेले होते. जवळपास ८०० भाविकांचा सहभाग या यात्रेत होता.
आतिश आनंदराव बारणे यांनी या आयोजित केलेल्या यात्रेत प्रत्येक भाविकाची योग्य अशी सोय करण्यात आली होती. यामध्ये चविष्ट भोजन तसेच उत्कृष्ट प्रकारचे नियोजन करण्यात आले. सर्व भाविकांनी त्यांच्या या नियोजनाचे कौतुक केले. यावेळी आतिश बारणे यांनी आपल्या याबद्दल भावना व्यक्त करताना सांगितले कि, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या प्रभागातील नागरिकांना मी पंढरपूर व अक्कलकोट या तीर्थक्षेत्राची यात्रा घडविली व या यात्रेत सर्व भाविकांसाठी योग्य असे नियोजन केल्यामुळे भाविकांनी जी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली त्यामुळे मी स्वतः भारावून गेलो आहे. मी माझ्या प्रभागाच्या विकासासाठी तसेच माझ्या प्रभागातील रहिवाशांसाठी नेहमीच कटिबद्ध असणार आहे.
आतिश बारणे हे वेळोवेळी आपल्या प्रभागातील नागरिकांना वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी अग्रेसर असतात. या यात्रेच्या निमित्ताने प्रभागातील नागरिक एकत्र येतील तसेच त्यांना तीर्थक्षेत्रांची यात्रा व विठुरायाची व स्वामी समर्थांचे दर्शन घडावे, या हेतूने यात्रा आयोजित करण्यात आले असल्याचे आतिष बारणे व आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. या यात्रेत सर्व भाविक आनंदाने उत्साहाने सहभागी झाले असल्याचे पाहावयास मिळाले.