शबनम न्युज | मुंबई
गद्दारीचा किडा मंगलप्रभात लोढा… पन्नास खोके एकदम ओके… छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात त्यांच्याच मलबार हिल विधानसभा मतदारसंघात जोरदार आंदोलन करण्यात आले.
भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी केल्याने याच्या निषेधार्ह मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व कार्याध्यक्ष राखीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष राज राजापूरकर, प्रदेश संघटक सचिव भालचंद्र शिरोळे, मुंबई उपाध्यक्ष बाप्पा सावंत, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे, दक्षिण मुंबई अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अयुब मेमन आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.