शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व मराठी विज्ञान परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या एक तारखेस विज्ञान व्याख्यान तसेच संगीत संध्या विशेष कार्यक्रम हा आयोजित करणेत येतो. ९५ वे पुष्प गुरुवार दिनांक ०१ / १२ / २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे आयोजित करण्यात आले. लोकप्रिय विज्ञान व्याख्याना अंतर्गत राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त “द बिगिनिंग ” हि विज्ञान एकांकीका “हिंदुस्थान अँन्टिबायोटिक्स स्कुल, पिंपरी ” यानी सादर केली. सदर व्याख्याना अंतर्गत विज्ञान एकांकीकेस मराठी विज्ञान परिषदेचे राजेन्द्र सराफ व विनय र. र. हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन सायन्स पार्कचे सुनिल पोटे यांनी केले.
सायंकाळी ७.०० वा. आयोजित संगीतसंध्या या विशेष कार्यक्रमात स्मिता उनकुले देशमुख यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. त्यानी सुरवातीला राग मधुवंती मध्ये बड़ा ख्याल मेहेमान नसे हा सादर केला. त्यानंतर द्रुत तीनतील मध्ये काहे मान करो” ही बंदीश सादर केली. त्यानंतर राग यमन मधील तीनताल मध्ये तराणा सादर केला. “अवघे गरजे पंढरपुर” ह्या भक्तिगीताने मैफलीची सांगता झाली. त्यांना तबल्यावर मिलीद देशमुख हार्मोनियमावर सोहम ताटे, तानपुरा सौ. भाग्यश्री लोहार आणि सौ. निलिमा बोरकर यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड सायन्स पार्क संस्थेचे संचालक तथा मा. सहशहर अभियंता (वि/या ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका श्री. प्रवीणजी तुपे उपस्थित होते. त्यानी कलाकारांचे कौतुक करत त्याच्या पुढील कलेसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार सुरेखा कुलकर्णी यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.