शबनम न्युज | हिंजवडी
घरातून एटीएम कार्ड चोरून एटीएम द्वारे हिंजवडी आणि नांदेड येथून १ लाख ७२ हजार रुपये काढून घेतले. ही घटना १० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पंचरत्न चौक हिंजवडी येथे घडली.
तेजस विठ्ठल मुंडे (वय ३०, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तेजस हे हिंजवडी येथे भाड्याने राहतात. त्यांच्या खोलीत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने पाकिटातून एटीएम कार्ड चोरून नेले. त्या एटीएम च्या आधारे हिंजवडी आणि नांदेड येथील एटीएम सेंटर मधून एक लाख ७२ हजार रुपये काढले. याबाबत तेजस यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या इसमावर संशय व्यक्त केला आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
Advertisement