राष्ट्रवादीचे मॅनेजमेंट सेल समितीचे शहराध्यक्ष अकबर मुल्ला यांच्या वतीने सामाजिक उपक्रम
पिंपरी चिंचवड: प्रतिनिधी
okbet cycling
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री ,देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व गरजू लोकांना रेशन किट व ब्लॅन्केट वाटप करण्यात आले या कार्यक्रम वेळी प्रसादभाई शेट्टी प्रमुख उपस्थित होते व तसेच हमीद शेख , शकरूल्ला पठाण उपस्थित होते , मॅनेजमेंट सेल समितीचे पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष : अकबर मुल्ला यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच मॅनेजमेंट सेल समिती चे पदाधिकारी सौरभ देसाई , शारुख कुरेशी अयान मोमीन , सिकंदर शेख यांनी विशेष सहकार्य केले.
राष्ट्रवादीचे अकबर मुल्ला हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात या सामाजिक उपक्रमातून समाजातील वंचित घटकांना लाभ मिळवून देण्याचे कार्य अनेक वर्षापासून ते करीत आले आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम राबवित असताना या वर्षी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब कुटुंबांना रेशन किटचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले. okbet motor sports betting
या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना अकबर मुल्ला यांनी सांगितले की शरद पवार साहेब यांचे विचार हे नेहमीच समाजातील वंचित घटकांचा विकास मोठ्या प्रमाणात व्हावा या उद्देशाने प्रेरित करतात याच प्रेरणेने मी त्यांच्या या वाढदिवसानिमित्त दरवर्षी समाजातील वंचित गरीब कुटुंबांना मदत होईल या हेतूने असे सामाजिक उपक्रम राबवित आलो आहे व यापुढेही शरद पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अविरतपणे माझ्या वतीने सुरू राहील यावेळी सर्व उपस्थितांचे आभार अकबर मुल्ला यांनी व्यक्त केले. okbet betting offer world cup