शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पि.एम.पि.एम.एल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने पद्मविभूषण मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त भोसरी डेपो मध्ये राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन व व्हिजन स्प्रिंग फाउंडेशन च्या सौजन्याने तिन दिवसीय (05/12 /2022 ते 07/12/2022 ) मोफत नेत्र तपासणी शिबीर व चष्मे वाटप शिबिराचे उद्घाटन पिं.चिं.शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सौ कविताताई आल्हाट व भोसरी आगार चे आगार व्यवस्थापक मा.विजयकुमार मदगे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सौ कविताताई आल्हाट व मा.विजय कुमार मदगे साहेब यांनी सर्व कामगार वर्ग त्याच्या कुटुंबातील सदस्य यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित पिं.चिं.शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मा.अजितभाऊ गव्हाणे,कामगार सेल चे अध्यक्ष किरणशेठ देशमुख, कार्याध्यक्ष युवराजभाऊ पवार, वाहतुक महासंघचे अध्यक्ष मा.काशिनाथ अण्णा जगताप ,सफाई कामगार सेल अध्यक्षा मा. सुवर्णाताई निकम ,वाहतुक महासंघ पिंपरी विधानसभा अध्यक्ष संदिपभाऊ निकम ,वाहतुक महासंघ पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष दीपकभाऊ तेली वाहतुक महासंघ भोसरी विधानसभा प्रभाग अध्यक्ष सूर्यकांत भोजने राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन उपाध्यक्ष कैलास आण्णा पासलकर, मा. दत्तात्रय कोतवाल मा.गणेशभाऊ गवळी मा. बापूसाहेब रायकर ईत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
क्रार्यकमाचे सूत्र संचालन मा. योगेशभाऊ चौधरी (अध्यक्ष भोसरी डेपो) यांनी केले व आभार प्रदर्शन मा.दिपक बापूसाहेब गायकवाड यानी केले यावेळी सर्व मान्यवरांनी पि.एम.पि.एम.एल राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन च्या उपक्रमाचे मनोगत व्यक्त करताना कौतुक करून शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व कामगारांनी आदरणीय सुनिल भाऊ नलावडे व पि.एम.पि.एम.एल राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन चे आभार मानले.