शबनम न्युज | चिंचवड
प्रतिनिधी : दिलीप सोनकांबळे
चिंचवड पत्राशेड झोपडपट्टी, पिंपरी लिंक रोड भाटनगर आणि बौद्धनगर या तीन ठिकाणी लुटमार तसेच परिसरात दहशत बसवण्यासाठी दुकानदार परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करत हवेत गोळीबार केल्याची थरारक घटना घडली. ही घटना काल (मंगळवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अवघ्या पाच तासात सीसीटिव्हीच्या आधारे तीनही आरोपींना अटक करण्याची आली.
शाहरुख शाहनवाज शेख त्याचा भाऊ फारुख शाहनवाज शेख आणि शोएब शेख असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नाव आहेत. त्यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात कलम ३०७, ५०४, ५०६ (२), ३४, आर्म ॲक्ट कलम ३ सह २५, महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ १ ३ सह १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ३ आणि ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ १ पोलीस उप आयुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (मंगळवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पत्राशेड झोपडपट्टी परिसरात रिक्षातून आलेल्या तिघा आरोपींनी एका किरणामाल दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच ते थांबले नाही त्यांनी तेथे जवळील पिस्टल मधून हवेत गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी पिंपरी लिंक रोड भाटनगर आणि बौद्धनगर या तीन ठिकाणी हवेत गोळीबार करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जलद गतीने तपासाला सुरूवात केली. तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांचे पाच पथके तयार करण्यात आले. आणि अवघ्या ५ तासात त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान दिवसाढवळ्या गजबजलेल्या या ठिकाणी गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तर गुन्हेगारांवर पिंपरी चिंचवड पोलिसांचा वचक राहिला नाही अशा चर्चा सुरू आहेत.