आक्षेपार्ह विधाने महाराष्ट्राचा जाणिवपूर्वक अपमान करण्यासाठी केली जात आहेत- इम्रान शेख
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने आज चिखली गाव येथील जाधव राजवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात “कडेलोट आंदोलन” घेण्यात आले.
यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजन महापुरुषांच्या विरोधात भाजप आणि आरएसएस विचार धारेतून येणारे नेते आक्षेपार्ह विधान करत आहेत. या मागे मोठं षडयंत्र असून बहुजन समाज यांच्या पायाशी ठेवण्यासाठी नव्याने प्रयत्न केले जात आहे. शिवछत्रपतींबाबत आणि बहुजन महापुरुष यांच्या विरोधात इतके वाद निर्माण करा, इतके वाद निर्माण करा की येणाऱ्या पिढ्यांनी या वादग्रस्त महात्म्याचे नाव घेणे देखिल टाळले पाहीजे हे यांच्या कृतीतून त्यांनी वेळी वेळी दाखवून दिले आहे.वादग्रस्त विधानं करणाऱ्या पाताळयंत्री लोकांना शिवछत्रपती नको आहेत.आरएसएस बीजेपीची चे लोक ठरवून शिवाजी महाराजांच्या मागे लागली असल्याचा संशय येत आहे परंतु ‘शिवाजी महाराज हि विज आहे चांगला वापर केला तर उर्जा मिळते,गैरवापर केला तर मोठ्ठा करंट बसतो.हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळेच असल्या वाचाळविरांचा आणि त्यांच्या विचारधारेच्या प्रतिमेचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे कडे करण्यात आले आहे.असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले,भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार महापुरुषांबद्दल आक्षेपार्य विधान करत आहेत. राज्यातील वातावरण दूषित करण्याचा त्यांचा डाव आहे.देशात राज्यात महागाई बेरोजगारी यासारखे महत्त्वाचे प्रश्न तापले असताना या प्रश्नावरून दिशा भटकवण्यासाठी मुद्दाम अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात. महापुरुषांचा चुकीचा इतिहास लोकांपुढे आणण्याचे षड्यंत्र भाजप रचत आहे. राज्यभरात विविध पक्ष संघटनेतर्फे इतकी आंदोलन त्यांच्या विरोधात झाली तरी देखील या वाचाळवीर मध्ये सुधारणा होताना दिसत नाहीये. यापुढे हे वाचाळवीर आटोक्यात नाही आले तर यांच्या लोकप्रतिनिधींच्या घरांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे घेराव घालण्यात येईल असा इशारा अजित भाऊ गव्हाणे यांनी दिला.
महिला अध्यक्ष कविता ताई आल्हाट म्हणाल्या “बहुजन महापुरुषांचा अपमान होत आहे तरी सामान्य जनता गप्प का आहे? जनतेने या वाचाळविरांचा समाचार घेतला पाहिजे. महापुरुषांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही.
शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे युवक शहरअध्यक्ष इम्रानभाई शेख, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक पंकज भालेकर,विकास साने, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, समिता गोरे,सुरज पटेल,युवराज पवार,सुरेश जाधव,अशोक मगर, काशिनाथ जगताप, दत्तात्रय जगताप, प्रसन्न डांगे, राहुल पवार, कविता खराडे, दीपक गुप्ता, अनुज देशमुख, ओम शिरसागर, सागर पवार,गणेश नागरे,रोहित मोरे,दिनेश पटेल, संजीवनी पुराणिक,निर्मला माने मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.