शबनम न्युज | मुंबई
okbet basketball
“आज जे गुजरात मध्ये घडले तेच उद्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत घडणार, गुजरात फक्त नांदी असून, मुंबई मनपा मध्येही असेच घडेल”, असा इशारा मंत्री, मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने भलतीच गरुड झेप घेतल्याचे चित्र आहे. अंतिम निकाल अद्याप हाती आले नसले, तरीही गुजरात मध्ये भाजपाची एक हाती सत्ता येणार हे स्पष्ट आहे.
okbet baseball betting
दरम्यान, लोढा म्हणाले, “पंतप्रधान मोदींजी वर गुजरातच्या जनतेने श्रद्धा दाखवली आहे. एक नवा इतिहास सुरू झाला आहे. आज गुजरात मध्ये एखादी विक्रमी विजय मिळवला जात आहे. गुजरात मध्ये जे काही घडलंय, तेच उद्या मुंबई महानगरपालिकेमध्ये घडणार आहे, ही फक्त नांदी आहे…सर्वांनी ऐकून घ्या,” असा इशारा देत मंगल प्रभात लोढा यांनी पालिका निवडणुकांवरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.okbet