अमर ओक, उत्तरा केळकर, केतकी माटेगावकर, ऋषिकेश रानडे यांचा घडणार संगीत आविष्कार
शबनम न्युज | चिंचवड okbet esport
श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव 10 ते 14 डिसेंबर 2022 या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम व सुगम संगीत, जुगलबंदी तसेच आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे 461 वे वर्ष आहे.
याबाबतची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री. मंदार महाराज देव यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 10 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. याप्रसंगी महापालिका आयुक्त शेखर सिंह, तसेच धर्मदाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, उमा खापरे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मुख्य विश्वस्त श्री योगेश देसाई, देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष श्री. नितीन महाराज मोरे, सासवड येथील संत सोपानदेव समाधी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अॅड. त्रिगुण तसेच देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री. जितेंद्र देव, हभप आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, श्री. विनोद पवार आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. okbet blackjack
महोत्सवानिमित्त दि. 10 ते 14 डिसेंबर या कालावधीत रोज सकाळी 6 वाजता नितीन दैठणकर यांचे श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर येथे व श्री तुकाराम दैठणकर यांचे श्रीमंगलमूर्ती वाडा येथे सनई-चौघडा वादन होईल. सकाळी 8.30 वाजता श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सकाळी 9 ते 12 या वेळेत श्री रबडे गुरुजी यांचा सौरयाग होईल. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत रक्तदान शिबिर, नेत्र व दंत चिकित्सा आणि आरोग्य शिबिर होईल. OKBET/a>
10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन होईल. सायंकाळी 7 ते 18 या वेळेत ह.भ.प पंकज महाराज गावडे यांचे कीर्तन आणि रात्री 8 ते 10 या वेळेत पं. दासोपंतस्वामी आळंदीकर यांच्या सोबत सिद्धेश उंडाळकर आणि ऋषिकेश उंडाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे पखवाज सहवादन होईल. 11 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 12 दरम्यान सामुहिक अभिषेक, नेत्र व दंत चिकित्सा शिविर होईल. दुपारी 12 ते 4 या वेळेत स्थानिक मंडळाचा भजन सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी 4 ते 6 दरम्यान दशावतारी नाट्य सादर केले जाईल. सायंकाळी 6.30 ते जल बंकापुरे, संस्कार भारती पिंपरी-चिंचवड यांचा मंदिरांच्या देशा हा कार्यक्रम 2022/12/08 12:360 वाजता अमर ओक, निलेश परब, सत्यजित प्रभू यांचा अमर बन्सी हा संगीत सेवेचा कार्यक्रम होणार आहे. racing okbet
12 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 4 दरम्यान भजन, सायंकाळी 5 ते 8 बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांचे कीर्तन होणार आहे. रात्री 8.30 वाजता उत्तरा केळकर व त्यांचे सहकलाकार यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते 6 दरम्यान ज्ञानदा सिद्धेश पंडीत यांचे कीर्तन, सायंकाळी 6 ते 8 दरम्यान श्री मोरया जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा तर, रात्री 8.30 वाजता फिल्मफेअर पुरस्कार विजेती गायिका केतकी माटेगावकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेता, पार्श्व गायक ऋषिकेश रानडे आणि त्यांचे सहकलाकार यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होईल. okbet f1
14 डिसेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता संजीवन समाधीची महापूजा होईल. सकाळी 6 वाजता सनई चौघडा वादन, सकाळी 7 वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी, त्यानंतर चरित्र पठण होईल. त्यानंतर सकाळी 8 ते 9 चिंचवड येथील स्वराज्य ढोलताशा पथकाची मानवंदना होईल. सकाळी 8 ते 10.30 दरम्यान रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यांनतर दुपारी 12 वाजता महाप्रसाद आणि रात्री 10 वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधी समोर आणि श्री मंगलमुर्ती वाडा येथे धुपार्ती होईल. त्यानंतर महोत्सवाची सांगता होईल.okbet tennis betting