शबनम न्युज | मुंबई okbet boxing odds
राज्यातील शसकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते अशा गोष्टी कर्नाटक बँकेतून करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय २०२१ मध्ये झाल्याचे स्पष्टीकरणात सांगितले. मात्र हे सर्व धादांत खोटं आहे असे छातीठोकपणे सांगून विधासभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्व गोष्टीचे खंडन केले. महाविकास आघाडी सत्तेत असताना काही खासगी बँकांसंदर्भात अडचणी समोर आल्या. या बँकांमध्ये कर्मचाऱ्यांनी खाती असल्यास वेतन अथवा भत्ते देताना अडचणी येऊ शकतात या उद्देशाने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतले होते. त्यावेळी हा प्रस्ताव आला होता मात्र त्याला आम्ही मंजूरी दिली नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
okbet esport
कर्नाटक सीमाप्रश्नावरून आखपाखड करत आहे अशावेळी या वेतन देण्याच्या भूमिकेवरून त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेत आहे का, असा सवाल त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला. देवेंद्र फडणवीस राज्याचे अनेक जबाबदार खाती सांभाळत आहेत तसेच मागील पाच वर्ष मुख्यमंत्री असणारी व्यक्ती जर अशाप्रकारे चुकीचे सांगत असेल तर बरोबर नाही, असेही अजित पवार म्हणाले. okbet blackjack