शबनम न्युज | पिंपरी
बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा चालक मालक संघटना, संयुक्त कृती समिती यांच्यावतीने १९ डिसेंबरला पुणे विभागीय कार्यालयावर बेमुदत आंदोलन करण्यात येणार तसेच हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले.
त्याचबरोबर अनधिकृत बाईक टॅक्सी विरोधात कारवाई करावी, यासाठी ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती रिक्षा संघटनांचे पदाधिकारी यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, पुणे पोलीस आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष अनंत तांबे, भाजप वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अंकुश नवले, जय महाराष्ट्र रक्षक संघटनेचे अध्यक्ष गुलाब सय्यद, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय रवळे, सावकाश रिक्षा संघटना अध्यक्ष प्रदीप भालेराव, छावा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पिंटू पांचाळ , अफजल पठाण, रुपेश भोसले, प्रकाश यशवंते, आप्पा हिरेमठ, विलास केमसे पाटील, मोहम्मद शेख, मुराद काजी सह एकूण १७ संघटनेचे प्रतिनिधींचा समावेश होता.