पगार न मिळाल्याच्या रागातून थेट परळीतून फोन
शबनम न्युज | पिंपरी okbet football
okbet gamers
मेट्रोच्या सुरक्षा व्यवस्थापकाला फोन करून धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगत पैशाची मागणी केल्याची घटना घडली होती. याघटनेची चौकशी करण्याचे आदेश स्वतः धनंजय मुंडे यांनी दिली होती. त्यानुसार फोन करणारा व्यक्ती बीड मधील परळी येथील असल्याचं समोर आलं आहे. तक्रारदार शिवदास साधू चिलवंत यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीचा पगार दिला नव्हता, म्हणून त्या व्यक्तीच्या नातेवाईकाने मी धंनजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतोय अस सांगून पैशांची मागणी केली होती. त्यामुळं तो फोन करणारा व्यक्ती हा परळीमधील असल्याचं उजेडात आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिवदास चिलवंत हे जी. के. सिक्युरिटी मध्ये मॅनेजर आहेत. तिथं टाकरस नावाचा व्यक्ती काम करतो. शिवदास यांनी टाकरस यांचा पगार केला नाही. म्हणून, याच रागातून टाकरस च्या नातेवाईकाने थेट परळीतून फोन करून मी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतोय, अस सांगून चिलवंत यांच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. या घटनेमुळं घाबरलेल्या चिलवंत यांनी चिखली पोलिसात तक्रार दिली. पोलिसांच्या तपासात तो फोन परळीतून आल्याचं निष्पन्न झालं असून तो धंनजय मुंडे यांच्या कार्यालयातून आला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. OKBET/a>
okbet esports