शबनम न्युज | नागपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार (दि. ११) रोजी नागपूर येथील समृद्धी महामार्ग तसेच इतर विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक केलं. “शिंदे फडणवीस सरकार हे डबल इंजिन सरकार असून वेगाने काम करत आहेत.” अशा शब्दात पंतप्रधानांनी शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक केलं.
“आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभ काम करताना आपण प्रथम गणेश पूजन करतो. आज नागपुरात असल्याने टेकडीच्या गणपती बाप्पाला माझं वंदन,” अशी मराठीत मोदींनी सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केलं. “आज महाराष्ट्राच्या विकासासाठी ११ तारीख उद्याला येत आहेत”, असं नरेंद्र मोदी म्हणाले. हे महानक्षेत्र महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा ऊर्जा देईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच विकास कामाचे उद्घाटन करताना आपल्याला आनंद होत असल्याची भावना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “स्वातंत्र्याला ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवात ७५ हजार कोटींच्या या विकासकामांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन. आजच्या या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात वेगाने काम करत असल्याचं दर्शवत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण २४ जिल्ह्यांना जोडत आहे. यामुळे शेतकरी, भाविक, उद्योगांना मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.