शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात देशातील सर्वात स्वच्छ ,सुंदर व राहण्यायोग्य शहर म्हणून नावलौकिक मिळवण्याची क्षमता असून त्यासाठी महापालिकेच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे, महापालिकेच्या नियोजनाला नागरिकांचा सक्रीय सहभाग आणि सहकार्य लाभल्यास स्वच्छ अभियानात शहराला नक्की यश मिळेल असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्येक्त केला. okbet ice hockey betting
महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा २०२३ या उपक्रमामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या विजेत्यांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी उपस्थित विद्यार्थी, नागरिक यांना संबोधित करताना ते बोलत होते. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उप आयुक्त अजय चारठाणकर, स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक विनोद जळक, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, विजयकुमार थोरात सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आरोग्य निरीक्षक यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक, विविध अशासकीय संस्था व बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिकेच्या वतीने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर कार्यक्षेत्राचे स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून छोट्या छोट्या विभागात विभागणी करून त्या विभागाची जबाबदारी संबंधित सफाई मित्रांवर सोपविण्यात आली आहे. सोपविण्यात आलेल्या परिसराच्या स्वछतेची जबाबदारी स्वच्छता मित्र व संबंधित कर्मचारी यांच्यावर असणार आहे. अशा परिसराचा आढावा स्वच्छता पथकाद्वारे दररोज घेण्यात येणार असून घेण्यात आलेल्या अढाव्याचा अहवाल दररोज आयुक्त शेखर सिंह यांना सादर करण्यात येणार आहे. त्याद्वारे आवश्यक ठिकाणी यंत्रणा आधिक सक्षम करून स्वच्छता उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. महापालिकेने केलेल्या या नियोजनामध्ये नागरिकांचा सक्रीय सहभाग महत्वाचा असून घरातील कचरा विलगीकरण करून घंटागाडीतील संबंधित कचऱ्याच्या कप्प्यात टाकणे, या अभियानात शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, हॉटेल, विविध अशासकीय व शासकीय आस्थापना, एनजीओ, महिला बचतगट, व्यापारी संकुले, विविध सामाजिक संघटना यांच्यासह नागरिकांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवल्यास यश नक्कीच प्राप्त होईल, असेही ते म्हणाले. okbet ice hockey
महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगाने ‘स्वच्छ वार्ड स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती, यामध्ये अ आणि ड क्षेत्रीय कार्यालयांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय क्रमांक मिळवला आहे. ही स्पर्धा स्वच्छ गृहनिर्माण संस्था, स्वच्छ शाळा, स्वच्छ भाजी मंडई, स्वच्छ शासकीय कार्यालये, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या गटात राबविण्यात आली होती. स्वच्छ गृहनिर्माण संस्था या गटात ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पिंपळे सौदागर येथील रॉयल पार्क सोसायटी आणि फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील तळवडे येथील देवी इंद्रायणी सोसायटी १ तळवडे यांनी संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उच्चाव होम्स, देवी इंद्रायणी सोसायटी २ तळवडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. पिंपळे सौदागर येथील रॉयल इम्पेरियल या सोसायटीने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
स्वच्छ शाळा स्पर्धेमध्ये इ प्रभागातील सिध्देश्वर हायस्कुल इंग्लिश मेडियम, द प्रभागातील द गुड सॅरमरिटन स्कुल वाकड, अ प्रभागातील सेंट उर्सुला उच्च माध्यमिक शाळा प्राधिकरण यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. फ प्रभागातील महापालिकेच्या सोनवणेवस्ती येथील शाळा क्र.९३ यांनी द्वितीय क्रमांक पटकावला असून अ प्रभागातील एल्प्रो इंटरनॅशनल स्कुल चिंचवड आणि फ प्रभागातील सरस्वती विश्व विद्यालय यांनी संयुक्तपने तृतीय क्रमांक मिळवला आहे. okbet sports betting
स्वच्छ भाजी मंडई या गटात अ प्रभागात आकुर्डी येथील खंडेराया भाजी मंडई यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. फ प्रभागातील कोयनानगर येथील श्री शिवछत्रपती भाजी विक्री मंडई यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर ग प्रभागातील डिलक्स मॉल यांना तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.
उत्कृष्ठ शासकीय कार्यालयांच्या गटामध्ये ग प्रभागातूनपोलीस स्टेशन वाकड यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे, तर ग प्रभागातील महावितरण पिंपरी, ह प्रभागातील परिचारी केंद्र सांगवी आणि फ प्रभागातील करसंकलन कार्यालय तळवडे हे सर्व तृतीय क्रमांकाचे संयुक्त मानकरी ठरले आहे.
स्वच्छ हॉटेल या श्रेणीमध्ये अ प्रभागातील मोरवाडी येथील कीज हॉटेल आणि ड प्रभागातील वाकड येथील हॉटेल सयाजी हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत तर ड प्रभागातील ताथवडे येथील हॉटेल रागा आणि पिंपळे गुरव येथील हॉटेल महाराजा हे अनुक्रमे द्वितीय व त्तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले आहेत.
स्वच्छ हॉस्पिटल स्पर्धेमध्ये फ प्रभागातील गुंजकर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांना प्रथम क्रमांक तर ग प्रभागातील आदित्या बिर्ला हॉस्पिटल यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तसेच अ प्रभागातील आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल यांना तृतीय पारितोषिक मिळाले आहे. okbet boxing odds
या व्यतिरिक्त महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर चित्रकला, जिंगल, लघुचित्रपट, स्ट्रीट प्ले, म्युरल आणि वाल पेंटिंग अशा स्पर्धा देखील राबविण्यात आल्या होत्या. चित्रकला या स्पर्धेमध्ये अ,ब,क,ड,इ,फ,ग,ह क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातून अनुक्रमे, साहिल काळे, राही सोलंकी, राही वायाल, ज्ञान्सी यादव, साक्षी पवार, राजवर्धन पांडगळे, मानसी मकर यांनी मानांकन मिळवले आहे.
तसेच जिंगल स्पर्धेमध्ये ब क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातून एस.बी. पाटील पब्लिक स्कूल आणि नेहा खांडवले, श्रावणी कांबळे यांना प्रथम पारितोषिक मिळाले असून ग प्रभागातील महापालिकेच्या वाल्हेकरवाडी येथील मुलांची शाळा आणि ड प्रभागातील अश्पाक शेख यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे, तसेच ड प्रभागातील समीक्षा कुंभार, सायली गवळी यांना तृतीय पारितोषिक मिळाले आहे.
लघुचित्रपट स्पर्धेमध्ये ब क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातून महापालिकेच्या वाल्हेकरवाडी येथील मुलांची शाळा यांना प्रथम क्रमांक, ग प्रभागातील सुनील पाटील यांना द्वितीय क्रमांक तर ब प्रभागातील चिंचवडेनगर येथील गुरुमैय्या स्कूल यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे.
स्ट्रीट प्ले स्पर्धेमध्ये अ प्रभागातून प्रतिभा महाविद्यालय, ब प्रभागातून एस.बी. पाटील पब्लिक स्कूल रावेत आणि महात्मा ज्योतीबा फुले या संस्थेला मानांकन मिळाले आहे. ड क्षेत्रीय कार्यालयातून श्री साई इंग्लिश स्कूल आणि महापालिकेच्या वैदुवस्ती शाळेला मानांकन मिळाले आहे, इ प्रभागातून यशस्वी प्रायमरी स्कूल, फ प्रभागातून संकेत देशमुख, ग प्रभागातून गोपीभाऊ कांबळे युवा फॉन्डेशन, ह प्रभागातून अमित बहिरट यांना मानांकन मिळाले आहे.
म्युरल आणि वाल पेंटिंग स्पर्धेमध्ये अ प्रभागातून अबास हुसेन शेख, ब प्रभागातून विजय पवार, ड प्रभागातून नितीन खरात, इ प्रभागातून छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालय, ग प्रभागातून वैशाली पवार आणि ह प्रभागातून शुभम वाघमित्र यांना मानांकन मिळाले आहे. okbet esport
स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२३ च्या अनुषंगाने शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, सी.एस.आर संस्था आणि नागरिक यांनी केलेल्या स्वच्छतेबाबच्या कार्याबद्दल त्यांचा स्वच्छता चॅम्पियन म्हणून गौरव करण्यात आला आहे. यामध्ये पठाण कियाक्त्बीन, कन्हैया सोलंकी, सुमेधबोधी वाघमारे, अनिल घनवट, नंदिनी गोरे, राहुल कदम, दिपाली गायकवाड, राधा सोलंकी, दत्तात्रय गुरव, पालाश सीएचएस च्या स्वाती कोरडे, मातृभूमी महिला बचत गटाच्या राजाबाई कसबे, इसीए चे गोरक्षनाथ सानप, धनलक्ष्मी महिला बचत गटाच्या संजीवनी डोंगरे, सुहासनी महिला बचत गटाच्या मनीषा गायकवाड, स्नेह फॉन्डेशन च्या सुधा भान, द्वारकासाई हेरीटेजचे शरद राठोड, पार्क रॉयलचे उदय साबळे, सदिच्छा महिला बचत गटाच्या राखी बालाजी, गुलमोहर कॉलनीतील ऋग्वेद गोसावी, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीकृष्ण फिरके, प्रेरणा महिला मंडळ आनंदवनच्या लक्ष्मी कापसे, शंतनू खंडाळकर, रघुनाथ शिंगटे, अपूर्वा चव्हाण, वैष्णवी पाटील, नवीन प्रल्हाद, शिवराम गावस, रामदास हिंगे, रोहित माळगे, रेश्मा बोरा, संगीता जोगदंड, रवींद्र इंगोले, सचिन खोले, यांचा समावेश आहे.
तत्पूर्वी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या वतीने क्षमता बांधणी व कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीत बदल घडवण्याच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत कॅम फॉन्डेशन मार्फत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी डॉ. अजित जगताप यांनी उपस्थित नागरिक, विद्यार्थी व कर्मचा-यांना योगाबाबत मार्गदर्शन केले.