शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी साडेदहा वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक दिन अर्थात पेन्शनर्स डे साजरा करण्यात येणार आहे. शहरातील सर्व केंद्र,राज्य, रेल्वे, महानगरपालिका, शिक्षक या सेवांमधून निवृत्त झालेल्या सेवानिवृत्तांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, डॉ.अमोल कोल्हे , आमदार उमा खापरे, लक्ष्मण जगताप, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात पेन्शन विषयाची देवाण घेवाण तसेच अहवाल सादरीकरण, सेवानिवृत्तांचे सत्कार आदी कार्यक्रम होणार असून मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. शहरातील सर्व केंद्र, राज्य, रेल्वे, महानगरपालिका, शिक्षक या सेवांमधून निवृत्त झालेल्या सेवानिवृत्तांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.