पिंपरी चिंचवड : ( प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड शहरातील म्हेत्रे वस्ती या ठिकाणी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम समाधानकारक होत नाही, या परिसरात सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे, यामुळे अतिशय दुर्गंधीचे वातावरण या परिसरात निर्माण झाले असल्याने तसेच या परिसरातील कचरा हा आठ दिवस झाले तरी उचलला जात नाही याबाबत अनेक तक्रारी या परिसरातील माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांच्याकडे नागरिकांनी केली, नागरिकांच्या या तक्रारीची दखल घेत माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांनी संबंधित आरोग्य अधिकारी यांच्याकडे परिसरातील कचऱ्याचे फोटो घेऊन या कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावावी व परिसर स्वच्छ व निरोगी करावा याकरिता निवेदन दिले, परंतु संबंधित सहाय्यक आरोग्य अधिकारी सौदाई हे कोणतीही दखल घेत नाही , त्यामुळे त्यांची बदली करावी तसेच त्यांचे जागी सक्षम असा अधिकारी नेमावा अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश मैत्री यांनी केली आहे.
परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने अत्यंत दुर्गंधीचे वातावरण परिसरात निर्माण झाले आहे आणि त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे परंतु सहाय्यक आरोग्य अधिकारी सौदाई हे याबाबत कोणतीही कारवाई करत नाही किंवा नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नाही त्यामुळे त्यांना या पदावरून दूर करावे व त्यांचे जागी सक्षम अधिकारी नेमावा अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांनी केली आहे आणि जर असे झाले नाही तर परिसरातील नागरिक हे तीव्र आंदोलन करतील असा इशाराही माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.