पिंपरी चिंचवड : शबनम न्यूज ( प्रतिनिधी )
न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून अवैध बांधकामांना लावलेला शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळ अधिवेशनात केल्यानंतर शहर भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला; तसेच ढोल- ताशा, हलगीच्या तालावर पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला.
भाजपच्या पिंपरी खराळवाडी येथील पक्ष कार्यालयासमोर हा जल्लोष करण्यात आला. या प्रसंगी माजी महापौर उषा ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, भाजपाचे चिंचवड विधानसभा निवडणूकप्रमुख शंकर जगताप, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे आदी उपस्थित होते.