पिंपरी चिंचवड : शबनम न्यूज ( प्रतिनिधी )
राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष , देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचेवाड शहरातील राष्ट्रवादी चे शहर उपाध्यक्ष बापू दिनकर कातळे यांच्या सौजन्याने व सिद्धार्थ नगर क्रिकेट क्लब, छत्रपती ग्रुप, यांच्या सहकार्याने मामुर्डी गाव येथे राष्ट्रवादी चषक भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आली , या स्पर्धेत हनुमान क्रिकेट क्लब प्रथम क्रमांक ने विजयी झाला.आहे सर्व खेळाडूंचे या वेळी सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बापू दिनकर कातळे उपसत होते तसेच या स्पर्धेचे बक्षीस वितरण त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले .या वेळी युवा नेते श्री. संदीप शेठ तरस, श्री.महेंद्र दळवी, श्री.ज्ञानेश्वर शेळके, योगेश पाटील, महेश राऊत, दीपक टिळेकर, सुनील राऊत, शेखर डगळे, तुषार गोरे, दीपक गायकवाड, मनीष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.