शबनम न्यूज : फिल्मी न्युज
शाहरुख खान मोस्ट अवेटेड पठाण चित्रपटामधील बेशरम रंग गाण्यानंतर दुसरं गाणं ‘झुमे जो पठाण’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. चित्रपट निर्माता सिद्धार्थ आहुजा याने नुकतंच गाण्याच्या प्रदर्शनाची तारिख सांगतिली होती मात्र चाहत्यांच्या आग्रहा मुळेगुरुवार (दि, 22 जिसेंबर) रोजी नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यामध्ये साहरुख आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण धमाकेदा डान्स करताना दिसून येत आहेत.
पठाण स्टारर शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचं बेशरम रंग नंतर हे दुसरं गाणं म्हणजेच ‘झुमे जो पठाण’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला अलं अससून सोशल मीडियावर चांगलीच क्रेज करत आहे. बॉलिवूडमधील लोप्रिय गायक आरिजित सिंग याने आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात गाणं गायिले आहे. त्याशिवाय संस्कृती कक्कड हिने देखिल आपल्या मधु आवाजात गाण्यामध्ये सुर लावले असून विशाल ददलानी याने कपोजिशन केले आहे. पठाण चित्रपटाचं हे दुसरं गाणं आहे जे गेल्या 10 दिवसानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
पठाण चित्रपटाचं पहिलं गाणं बेशरम रंग प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यामध्ये अडकलं असून त्यापेक्षा जास्त लोकांना ते गाणं आवडलं आहे. त्याशिवाय अनेक सेलिब्रिटी आणि प्रेक्षक बेशरम रंग गाण्यावर रिल्स व्हिडिओ बनवत आहे. युट्युबवर बेसरम रंग गाण्याला 10 कोटीपेक्षाही जास्त व्युज मिळाले असून युट्यबवर नंबर 1 ट्रेंचिंगला दाखवत आहेत. अशात हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे की, ‘झुमे जो पठाण’ या गाण्याला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळतो.