पिंपरी चिंचवड , ( शबनम न्यूज प्रतिनिधी ) – चौघांनी मिळून पिं कारचालकाला मारहाण केली. तसेच, त्याच्याकडून वै जबरदस्तीने पेटीएम द्वारे पैसे ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. ही घटना शुक्रवारी (दि. २३) रात्री साडे अकराच्या सुमारास इन्फोसिस सर्कलच्या पुढे हिंजवडी येथे घडली.
अभिषेक पारस पुंगलिया (वय ४०, रा. रुबी पार्क स्ट्रीट, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या कारमध्ये हिंजवडी येथील हैदराबाद बिर्याणी हाऊस समोरून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवून मारहाण केली. तसेच, त्याच्याकडून पेटीएम द्वारे दोन हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले.
Advertisement